उद्देश
Posted by Swami on July 3, 2006
शेती हा सर्व प्रकारच्या मुलभूत मानवी गरजांची पूर्तता करता येण्यासाठीची जीवन जगण्याची ‘जीवनपध्द्ती‘ आहे.
आजच्या वेगवान जीवनात माणसाच्या जास्तीत जास्त घेण्याच्या काळात ,जमीनीची काळजी ज्या पध्दतीने घ्यायला हवी होती ती न घेतल्यामुळे शेतकरी आज संकटात सापडलेला आहे.
सर्व प्रश्नांचे उत्तर जमीन – मातीतच दडलेले आहे. त्या सुधारण्याच्या साध्या सोप्या पध्दती आम्ही प्रयोग करून विकसित केल्या आहेत , करत आहोत.
सेंद्रीय शेती करत असताना आम्ही सन 2002 पासून ,पुढील शेती व्यवस्थापन पध्दतीवर अभ्यास – प्रयोग करत आहोत.
1. जमीन तयार करण्याच्या पध्दती
2. नियमित माती निर्मीती प्रकार
3. पाणी (मोजका वापर )
4. पीक –
अ. बीज संस्कार
ब. टोकणी पेरणीक. वाढीच्या अवस्था
5. मिस्र पीक पध्दती अ. आंतरपीक पध्दती / फेरपालटची पीक पध्दती
6. खत निर्मीती – हिरवळीचे खत प्रकार
7. सेंद्रीय शेतीमाल – स्वयं विक्री पध्दती
8. शेती अर्थशास्त्र – शेतीचा हिशोब ठेवण्याच्या सोप्या पध्दती