मशागत
Posted by Swami on July 22, 2006
आम्ही जी पिके घेतो (सोयाबिन, गहू, हरभरा) त्यांचे अवशेष, काडी कचरा तसेच सर्व हिरवळीची पिके, मिश्रधान्य या सर्वांचा आम्ही हिरवळीचे खत म्हणून वापर करतो
हिरव्या सुक्या पाल्याचे बारिव तुकडे होणे व तो विशिष्ठ टप्प्यावर मातीत वरच्या चार इंच थरात मिसळणे आम्हाला आवश्यक वाटते.
या कारणास्तव आम्ही तेरा हॉर्स पॉवरचा छोटा (पॉवर टिलर) ट्रॅक्टर उपयोगात आणतो. शेतीतील सर्व कामे आम्ही स्वतः करतो. खरीपातील आठ दिवस मशागतीसाठी योग्य वेळी बैल जोडी भाडयाने मिळणे शक्य होत नाही. प्रयोग, टिपन, नोंदी, शेतकर्यांच्या भेटी,प्रवास या कारणांनी बैल पाळणे ही कठीण गोष्ट होउन बसली आहे.
वरील चार इंचातील मशागत सरी वरंभा तयार करणे या कामासाठी कमी वजन असणारे व डिझेल कमी लागणारे पॉवर टिलरचा उपयोग आम्ही आमच्या शेतात में 2004 पासून करत आहोत.
पॉवर टिलरसाठी डिझेलचा वापर आम्ही करतो त्यामुळे भविष्यात बायोडिझेलच्या निर्मितीसाठी करंजीची झाडे सजीव कुंपनासाठी लावली आहेत. त्याचप्रमाणे एरंडीची, कडुनिंबाची झाडे आम्ही बांधावर लावली आहेत.
सरी वरंभा पद्वत मुळयांच्या विस्तारासाठी मोकळी माती पुरवते. जादा पाणी सोडून देते. पाणी कमी पडल्यास ते पूरवणे सोयीचे जाते. पेरणी मात्र टोकण पद्धतीने करावी लागते. मुळयांचा एकूण विस्तार, खोली यांचा अभ्यास आपणास मशागत किती खोलीवर आवश्यक आहे ते सांगते.
सरी वरंभा पीक पद्धती आम्हाला योग्य वाटते.
Amit Teli said
प्रिय श्री व सौ स्वामी,
सप्रेम नमस्कार,
सैंद्रीय शेतीबाबत आपले प्रेम आणि हाती घेतलेले इतर उपक्रम ह्यांबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन.
एकूणच ब्लॉग फार चांगला वाटला.
ताज्या घडामोडी/प्रयोग व माहिती अशीच लिहीत राहा.
-अमित