Swami Venturers

सेंद्रीय शेतीच्या अभ्यासासाठी वाहून घेतलेला ब्लॉग

Swamiventurers.com

Posted by Swami on अगस्त 6, 2006

Visit our website www.swamiventurers.com for more details.

Posted in Uncategorized | Leave a Comment »

मशागत

Posted by Swami on जुलाई 22, 2006

आम्‍ही जी पिके घेतो (सोयाबिन, गहू, हरभरा) त्‍यांचे अवशेष, काडी कचरा तसेच सर्व हिरवळीची पिके, मिश्रधान्‍य या सर्वांचा आम्‍ही हिरवळीचे खत म्‍हणून वापर करतो

हिरव्‍या सुक्या पाल्‍याचे बारिव तुकडे होणे व तो विशिष्‍ठ टप्प्यावर मातीत वरच्‍या चार इंच थरात मिसळणे  आम्‍हाला आवश्यक वाटते.

या कारणास्‍तव आम्‍ही तेरा हॉर्स पॉवरचा छोटा (पॉवर टिलर) ट्रॅक्टर उपयोगात आणतो. शेतीतील सर्व कामे आम्‍ही स्‍वतः करतो. खरीपातील आठ दिवस मशागतीसाठी योग्‍य वेळी बैल जोडी भाडयाने मिळणे शक्य होत नाही. प्रयोग, टिपन, नोंदी, शेतकर्‍यांच्या भेटी,प्रवास या कारणांनी बैल पाळणे ही कठीण गोष्ट होउन बसली आहे.

 वरील चार इंचातील मशागत सरी वरंभा तयार करणे या कामासाठी कमी वजन असणारे व डिझेल कमी लागणारे पॉवर टिलरचा उपयोग आम्‍ही आमच्‍या शेतात में 2004 पासून करत आहोत.

पॉवर टिलरसाठी डिझेलचा वापर आम्‍ही करतो त्यामुळे भविष्‍यात बायोडिझेलच्या निर्मितीसाठी  करंजीची झाडे सजीव कुंपनासाठी लावली आहेत. त्याचप्रमाणे एरंडीची, कडुनिंबाची झाडे आम्‍ही बांधावर लावली आहेत.

 सरी वरंभा पद्वत मुळयांच्‍या विस्‍तारासाठी मोकळी माती पुरवते. जादा पाणी सोडून देते. पाणी कमी पडल्‍यास ते पूरवणे सोयीचे जाते. पेरणी मात्र टोकण पद्धतीने करावी लागते. मुळयांचा एकूण विस्‍तार, खोली यांचा अभ्‍यास आपणास मशागत किती खोलीवर आवश्‍यक आहे ते सांगते.

सरी वरंभा पीक पद्धती आम्‍हाला योग्‍य वाटते.

Posted in जमिन | 1 Comment »

शेतजमिन (माती) तयार करण्याच्या पद्धती:

Posted by Swami on जुलाई 14, 2006

शेतजमिन (माती) तयार करण्याच्या पद्धती:

मातीचे भौतिक, रासायनिक, जैविक घटक असे गुणधर्म पाहवयास मिळतात. मातीचा पोत, कस आणि सजीवता अशा प्रकारे आपण मातीची सुधारणा करताना अभ्यासाचे मुद्दे ठरवायला हवेत.

 अ. माती सपोत करणे.
ब. कसदार करणे
क. सजीव करणे


आपण कशाप्रकारची पिके घेत आहोत ,घेणार आहोत, पिकांचा एकूण कालावधी , आयुष्य किती आहे, पिकांची उंची, मुळांचा विस्तार, पर्णक्षेत्र, वनस्पती जमिनीतून , हवेतून एकूण कोणकोणते घटक किती प्रमाणात घेते इ. गोष्टींचा अभ्यास पोत ,कस सजीवता वाढवण्याबरोबर करणे जरुरीचे आहे.  

  • मातीत बी पेरले की काही दिवसातच तिची वाढ कशाप्रकारे होत आहे , मुळी रसरशीत वाढते आहे, मातीचा भुसभुशीतपणा, खेळती हवा, आवश्यक तेवढाच ओलावा, आवश्यक ते सर्व विविध प्रकारचे सेंद्रिय घटक किती प्रमाणात आहेत, वनस्पतीचे प्रत्येक पान आकाराने मोठे होत आहे का ? यावरूनच आपणास माती कशी आहे हे समजावून घेता येते. आपली शेतजमिन, उभी पिके आपल्याशी बातचीत करत असतात.
  • हिरवा पाला, सुका पाला, धागायुक्त पदार्थ, भाताचे तूस, मळणीनंतरचे गहु ,सोयाबीन इ. चा भुसा, कादी कचरा, टरफले इत्यादी हे मातीचा पोत वाढविणारा घटक आहेत.
  • कस : कस म्हणजे वनस्पतीचे अन्न घटक . मातीत आपण जी विविध प्रकारातील  खते टाकतो ती सेंद्रिय अथवा रासायनिक प्रकारात मोडतात. ह्या प्रकारचे अन्न घटक वा कस हे झाडाचे अन्न नाही. सूर्य ऊर्जेचे रुपांतर करत पाने ग्लुकोज साखर बनवतात. त्याचे रुपांतर ती झाडे त्यांना हव्या त्या पिष्ठ, काष्ठ, नत्र,प्रथिन, स्निग्ध, तेल इ. स्वरूपात करत  असतात. व स्वतः साठी वापरतात.
  • खत  ( कोवळे टाळे, राख , हिरवी पाने, मासळी कुट, कोंबडीची विष्ठा, शेळीच्या लेंढ्या, खरकटे अन्न, मूत्र-घाम , लोकर-केस-पीस, वरवरची तापलेली धूळ, तेल बियांची पेंड इत्यादी)  हे वनस्पतीचे अन्न नसते तर त्या कस वाढवणारे घटक होत. कस झाडाच्या वाढीसाठी, वापरासाठी, संरक्षणासाठी लागणार्‍या गोष्टी बनवण्यास घटक रूपाने मदत करतात.

 

सजीव माती : जमिनीवर आपण जी सजीव सृष्टी  पाहतो त्यापेक्षाही सुंदर सृष्टी जमिनीत सहयोगी सहजीवन जगत आहे. एकमेकांना सहकार्य करत  जगणारे कोट्यावधी जीव ( मोठया उंदीर सापापासून ते अती सूक्ष्म जीवजंतूपर्यंत ) आपणास पहावयास मिळतात.

वनस्पतीस उपयोगी असणार्‍या सूक्ष्म जीवजंतूच्या वाढीसाठी जमिन सतत हिरवी ठेवणे आवश्यक आहे  कारण हिरव्या वनस्पतीची सततची वाढणारी मुळी या सूक्ष्मजीवजंतूचे आश्रयस्थान आहे.

माती सजीव  झाल्यांनंतर आपले शेती उत्पन्न वाढण्यासाठी आवश्यक असलेले मातीत झालेले बदल आपणास पाहवयास मिळतील.  

नियमित माती निर्मिती   माती निर्मिती शाश्वत शेती उत्पन्नासाठी आवश्यक आहे. माती बनवण्याची पद्धत – प्रयोग अभ्यास, टिपन, नोंदी उपलब्ध

Posted in खत निर्मिती, जमिन | Leave a Comment »

माती संरक्षण ( बांध-बंदिस्ती)

Posted by Swami on जुलाई 14, 2006

शेतज‍‍मिनीतील मातीचे संरक्षण करत असताना पावसाचे जादाचे पाणी शेतातच थांबल्यास पिकाचे नुकसान होते. योग्य मार्गाने त्याला वाट करुन दिल्यास होणारे नुकसान आपल्याला टाळता येते.

त्यासाठी बांध-बंदिस्ती महत्वाची आहे.  

  • पाण्याच्या प्रवाहानुसार शेतात पाट काढून आणि
  • पाण्याच्या प्रवाहाचा वेग कमी करण्यासाठी वेगवेगळ्या गवताचा वापर करता येतो.

नियमित माती निर्मितीसाठी शेतजमिनीचे -मातीचे संरक्षण ही गोष्ट सततच्या निरीक्षणाने अभ्यासाने व क़ृतीने आपणास सहज शक्य आहे.

Posted in जमिन | Leave a Comment »

मातीचे संरक्षण ( सजीव कुंपनाचा उपयोग)

Posted by Swami on जुलाई 8, 2006

सजीव कुंपन म्हणजे वनस्पतींचा कुंपनासाठी वापर करणे.

सजीव कुंपन शेतीचे संरक्षण  व माती निर्मीतीमध्ये आपली मदत करण्याबरोबरच परिसरातील

 निसर्गाचा समतोल राखण्यास ही मदत करते.

सजीव कुंपनाचे प्रकार

1. कायमचे कुंपन : यात मुख्यतः बरीच वर्षे टिकणार्‍या झाडांचा समावेश होतो. उदा. निरगुडी ,

करंज, एरंड, शेवगा, ग्लिरिसीडीया इ.

2. वार्षिक कुंपन – उदा. ढैलच्या,शेवरी इ.  

पुढील गोष्टी लक्षात घेऊन तुमच्या गरजेप्रमाणे  कुंपनासाठी झाडे निवडा-

1. झाड उंच वाढणारे की बुटके.

2. सदाहरित

3. पक्षांना घरटी करण्यास योग्य पान

4. वार्‍याला अडवणारी

5. छाटणी केल्यास झपाट्याने पाने वाढणारी

6. पानांचा हिरवळीचे खत म्हणून वापर होऊ शकेल अशी

7. अनेक छाटण्या करता येतील अशी

8. जळावू लाकूड पुरवणारी

9. फळे देणारी

10. जास्त किंवा कमी आयुष्य असणारी

11. जनावरांना चारा पुरवणारी

अधिक शेती उत्पादनासाठी जमिनीचा कस , पोत टिकवुन ठेवणे खुप महत्वाचे आहे.  जमिनीचा

कस , पोत नष्ट करणा-या आणि पिकांचे नुकसान करणार्‍या गोष्टी  आणि सजीव कुंपन

त्यांच्यापासून पिकांच्या बचावासाठी कसे मदत करते हे आता आपण पाहू.   

1. धूप वेगाने वाहणारा वारा आणि पाऊस या गोष्टी जमिनीची धूप होण्याला जबाबदार आहेत.  

सजीव कुंपन वेगाने वाहणारा वारा अडवते तर जास्त पाऊस झाल्यास बाहेरून येणार्‍या पाण्याच्या लोटाचा वेग कमी करते.

2. प्रचंड थंडी  व 3. प्रखर सुर्यप्रकाश (जमिनीतील आद्रता कमी करतो.)

सजीव कुंपन मातीतील सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी लागणार्‍या पोषक तापमान निर्मितीसाठी आणि आर्द्रता चक्र निर्मितीसाठी मदत करते. 

4. माणसाचा हस्तक्षेप  आणि5. पाळीव व रानटी जनावरांपासून होणारे नुकसान यांच्यापासून सजीव कुंपन आपली मदत करते.  

त्याच बरोबर शेतीसाठी लागणारे हिरवळीचे खत व  जळावु लाकुड यांची काहीप्रमाणात गरज भागवते. 

 

Posted in जमिन | Leave a Comment »

उद्देश

Posted by Swami on जुलाई 3, 2006

शेती हा सर्व प्रकारच्या मुलभूत मानवी गरजांची पूर्तता करता येण्यासाठीची जीवन जगण्याची जीवनपध्द्तीआहे.

आजच्या वेगवान जीवनात माणसाच्या जास्तीत जास्त घेण्याच्या काळात ,जमीनीची काळजी ज्या पध्दतीने घ्यायला हवी होती ती न घेतल्यामुळे शेतकरी आज संकटात सापडलेला आहे.

सर्व प्रश्नांचे उत्तर जमीन मातीतच दडलेले आहे. त्या सुधारण्याच्या साध्या सोप्या पध्दती आम्ही प्रयोग करून विकसित केल्या आहेत , करत आहोत.

सेंद्रीय शेती करत असताना आम्ही सन 2002 पासून ,पुढील शेती व्यवस्थापन पध्दतीवर अभ्यास प्रयोग करत आहोत.

1. जमीन तयार करण्याच्या पध्दती

2. नियमित माती निर्मीती प्रकार

3. पाणी (मोजका वापर )

4.  पीक
अ. बीज संस्कार   
ब. टोकणी पेरणी
क. वाढीच्या अवस्था

5. मिस्र पीक पध्दती अ. आंतरपीक पध्दती / फेरपालटची पीक पध्दती

6. खत निर्मीती हिरवळीचे खत प्रकार
7. सेंद्रीय शेतीमाल स्वयं विक्री पध्दती

8. शेती अर्थशास्त्र शेतीचा हिशोब ठेवण्याच्या सोप्या पध्दती

Posted in Uncategorized | Leave a Comment »