Swami Venturers

सेंद्रीय शेतीच्या अभ्यासासाठी वाहून घेतलेला ब्लॉग

शेतजमिन (माती) तयार करण्याच्या पद्धती:

Posted by Swami पर जुलाई 14, 2006

शेतजमिन (माती) तयार करण्याच्या पद्धती:

मातीचे भौतिक, रासायनिक, जैविक घटक असे गुणधर्म पाहवयास मिळतात. मातीचा पोत, कस आणि सजीवता अशा प्रकारे आपण मातीची सुधारणा करताना अभ्यासाचे मुद्दे ठरवायला हवेत.

 अ. माती सपोत करणे.
ब. कसदार करणे
क. सजीव करणे


आपण कशाप्रकारची पिके घेत आहोत ,घेणार आहोत, पिकांचा एकूण कालावधी , आयुष्य किती आहे, पिकांची उंची, मुळांचा विस्तार, पर्णक्षेत्र, वनस्पती जमिनीतून , हवेतून एकूण कोणकोणते घटक किती प्रमाणात घेते इ. गोष्टींचा अभ्यास पोत ,कस सजीवता वाढवण्याबरोबर करणे जरुरीचे आहे.  

  • मातीत बी पेरले की काही दिवसातच तिची वाढ कशाप्रकारे होत आहे , मुळी रसरशीत वाढते आहे, मातीचा भुसभुशीतपणा, खेळती हवा, आवश्यक तेवढाच ओलावा, आवश्यक ते सर्व विविध प्रकारचे सेंद्रिय घटक किती प्रमाणात आहेत, वनस्पतीचे प्रत्येक पान आकाराने मोठे होत आहे का ? यावरूनच आपणास माती कशी आहे हे समजावून घेता येते. आपली शेतजमिन, उभी पिके आपल्याशी बातचीत करत असतात.
  • हिरवा पाला, सुका पाला, धागायुक्त पदार्थ, भाताचे तूस, मळणीनंतरचे गहु ,सोयाबीन इ. चा भुसा, कादी कचरा, टरफले इत्यादी हे मातीचा पोत वाढविणारा घटक आहेत.
  • कस : कस म्हणजे वनस्पतीचे अन्न घटक . मातीत आपण जी विविध प्रकारातील  खते टाकतो ती सेंद्रिय अथवा रासायनिक प्रकारात मोडतात. ह्या प्रकारचे अन्न घटक वा कस हे झाडाचे अन्न नाही. सूर्य ऊर्जेचे रुपांतर करत पाने ग्लुकोज साखर बनवतात. त्याचे रुपांतर ती झाडे त्यांना हव्या त्या पिष्ठ, काष्ठ, नत्र,प्रथिन, स्निग्ध, तेल इ. स्वरूपात करत  असतात. व स्वतः साठी वापरतात.
  • खत  ( कोवळे टाळे, राख , हिरवी पाने, मासळी कुट, कोंबडीची विष्ठा, शेळीच्या लेंढ्या, खरकटे अन्न, मूत्र-घाम , लोकर-केस-पीस, वरवरची तापलेली धूळ, तेल बियांची पेंड इत्यादी)  हे वनस्पतीचे अन्न नसते तर त्या कस वाढवणारे घटक होत. कस झाडाच्या वाढीसाठी, वापरासाठी, संरक्षणासाठी लागणार्‍या गोष्टी बनवण्यास घटक रूपाने मदत करतात.

 

सजीव माती : जमिनीवर आपण जी सजीव सृष्टी  पाहतो त्यापेक्षाही सुंदर सृष्टी जमिनीत सहयोगी सहजीवन जगत आहे. एकमेकांना सहकार्य करत  जगणारे कोट्यावधी जीव ( मोठया उंदीर सापापासून ते अती सूक्ष्म जीवजंतूपर्यंत ) आपणास पहावयास मिळतात.

वनस्पतीस उपयोगी असणार्‍या सूक्ष्म जीवजंतूच्या वाढीसाठी जमिन सतत हिरवी ठेवणे आवश्यक आहे  कारण हिरव्या वनस्पतीची सततची वाढणारी मुळी या सूक्ष्मजीवजंतूचे आश्रयस्थान आहे.

माती सजीव  झाल्यांनंतर आपले शेती उत्पन्न वाढण्यासाठी आवश्यक असलेले मातीत झालेले बदल आपणास पाहवयास मिळतील.  

नियमित माती निर्मिती   माती निर्मिती शाश्वत शेती उत्पन्नासाठी आवश्यक आहे. माती बनवण्याची पद्धत – प्रयोग अभ्यास, टिपन, नोंदी उपलब्ध

टिप्पणी करे